स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यातील संचलन स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

0
स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यातील संचलन स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यातील संचलन स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील मेजर सोमनाथ शर्मा स्काऊट पथक हे स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यातील संचलन स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
स्काऊट गाईड जिल्हा मेळावा अहमदपूर येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सैनिकी विद्यालयातील अठरा विद्यार्थी सहभागी झाले होते. तिथे झालेल्या संचलन स्पर्धेत सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच अहमदपूर शहरातून निघालेल्या शोभा यात्रेमध्ये सैनिकी विद्यालयाच्या मेजर सोमनाथ शर्मा स्काऊट पथकाने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.
विचारमंचावरील मान्यवर माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख जीवन कुमार मद्देवाड, स्काऊट गाईडचे राज्य संघटन उपायुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा संघटन आयुक्त डॉ. शंकर चामे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात यश संपादन केल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे व त्यांचे प्रमुख उमाकांत नादरगे यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!