योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न

0
योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न

योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी. ऊगीले) : रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान,उदगीर द्वारा आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयातील योगेश रायलवाड याचा प्रथम क्रमांक तर आर्यन जाधव याचा चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आला त्यामुळे त्यांचा सत्कार संपन्न झाला.
लोकसंस्कृती साहित्य संमेलन उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात निबंध स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल योगेशचा तर चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्यामुळे आर्यन जाधव याचा सत्कार विचार मंचावरील मान्यवर जिल्हा परिषद लातूरचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व इतर मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सहशिक्षक मारोती मारकवाड, प्रल्हाद येवरीकर उपस्थित होते.
योगेश रायलवाड व आर्यन जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे व यांचे मार्गदर्शक सहशिक्षक उमाकांत नादरगे व मारोती मारकवाड यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!