ग्रामपंचायत अधिकारी सविता शिंदे यांना ‘ग्रामरत्न पुरस्कार’ प्रदान
ग्रामपंचायत अधिकारी सविता शिंदे यांना 'ग्रामरत्न पुरस्कार' प्रदान
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी सविता शिंदे यांना सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दिला जाणारा सर्वोत्तम राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी सविता शिंदे यांनी गावाचा विकास करत लोकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेवून शेतकर्यांना जनावरांसाठी गोठे, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, गावातील गावतंर्गत रस्ते, नाली, पाईपलाईन, जलजीवन अंतर्गत विहीर, पाण्याची टाकी, आर. ओ. प्लान्ट, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, शिवरस्ते, गावातील दिवाबत्ती, नाली-सफाई, अंगणवाडी डिजीटल, सी. सी. टि ही, घनकचरा व सांड पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, नाला दुरुस्ती, गरजवंत निराधार महिलेला लोक सहभागातून घरकूल, महिला सक्षमीकरणासाठी ग्रामसभा, मासिक सभा, महिला बचत गटासाठी व्यवसायिक प्रशिक्षण, फळबाग लागवड, शेतकर्यांना सिंचन विहीर, अटल भुजल योजनेतून गावात पर्जन्यमापक बसवले, दिव्यांगाना वैद्यकीय निधी वाटप, जि.प. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम केले, रक्तदान शिबीर अशा विविध प्रकारच्या योजना सक्षमपणे राबविल्यामुळे उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी सौ. शिंदे सविता यांना सर्वोत्तम राज्यस्तरीय ‘ग्रामरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी रोहीणी नर्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, सोशल टिमचे उत्तम शेळके व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
