कलावंताच्या कुंचल्याने रसिकांची मने जिंकली

0
कलावंताच्या कुंचल्याने रसिकांची मने जिंकली

कलावंताच्या कुंचल्याने रसिकांची मने जिंकली

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व रंगकर्मी प्रतिष्ठान, उदगीर आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनात सृजन रंगकर्मी कलादालनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून चित्र दालनाचे शुभारंभ पार पडले.
कलावंताच्या कुंचल्यातून साकारलेली अनेक चित्र कलारसिकांची, साहित्यकांचे तसेच दालनात येणाऱ्या सर्व लहान थोर व्यक्ती व बालचिमुकल्यांची मने जिंकली.
प्रत्येक कला रसिक चित्र दालनात येण्यासाठी उत्सुक होता.यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव व कला रसिकांनी दिलेली दाद हा क्षण अतुलनिय होता.

  'जेव्हा शब्द मुके होतात,तेव्हा चित्रातील भाव बोलू लागतात.'

अप्रतिम कला सृजनाचे प्रदर्शन साहित्य रसिकांसाठी मेजवानी ठरली.येथिल चित्रांनी जणू रसिकांसोबत संवाद साधला असावा अशा प्रसन्न भावमुद्रांनी कलारसिक अनेक शुभेच्छासह दाद दिली.या साहित्य संमेलनात कलादालनास रसिकांनी व संयोजकांनी एका भव्य उंचीवर नेवून ठेवले.
स्थानिक कलावंत व महाराष्ट्रातील कलावंतांनी साकारलेली चित्रांनी अनेकांची मने जिंकून घेतली.
विविध माध्यमातून निरनिराळे साकारलेली चित्र रसिकांना पहाता आली. संमेलनात चित्र प्रदर्शनासाठी आँनलाईन कलावंतांना संपर्क साधून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चित्र प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.यामुळे अनेक कलावंतांना अद्वितीय आणि अवर्णनिय अनुभव घेता आला.
सदरील सृजन रंगकर्मी कला दालनाचे शुभारंभ डॉ.मार्तंड कुलकर्णी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, प्राध्यापक प्रकाश होळकर, प्रा.बिभिषण मद्देवाड यांच्या हस्ते करण्यात झाले.संमेलनाध्यक्ष प्रा.इंद्रजीत भालेराव सुप्रसिद्ध साहित्यिक परभणी, प्रसिद्ध सिने अभिनेत्री आदिती सारंगधर, उद्घाटक मा.आ.संजय बनसोडे माजी क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य, स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, कार्यवाहक रामचंद्र तिरुके, डायटचे प्राचार्या डॉक्टर भगीरथी गिरी मॅडम,सिद्धार्थ सूर्यवंशी, मारोती भोसले, रामदास केदार, जहांगीर पाटेल, रसूल पठाण, अडवोकेट महेश मळगे अधिव्याख्याता भापकर सर, विलास सिंदगीकर,विजय चव्हाण,विजयकुमार बैले,
कपिल बिरादार, मोहन तेलंगे, शिवकुमार गुळवे, नागनाथ स्वामी, विवेकानंद मठपती जयप्रकाश हराळे,सौ अर्चना माने, बसवेश्वर थोटे, अनिता खडके,अरुणा कांदे
आदिसह अनेक मान्यवरांनी
कलादालनास भेट देऊन कौतुकास्पद अभिप्राय व शुभेच्छा दिल्या.
सुजरील प्रदर्शनात प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे,
प्रसिद्ध चित्रकार प्रशांत सोळुंके, ग्राफिक्स डिझायनर शिवाजी हांडे लातूर,विनोद गरड कन्नड,दीपक सोनवणे संभाजीनगर, सोनम भामरे संभाजीनगर, लीलाधर पाचपोळे,पुर्वा बेथारिया संभाजीनगर,मनिषा घट्टे गंगापूर, स्वाता बोडखे पैठण,अनिलराज पाटील जळगाव, दीपक जगताप मोरगाव, पद्मा कळसकर वैजापूर, पद्माकर कोळी जळगाव, दगडू रणखांब लातूर,राजाभाऊ बनाळे लातूर, भगवान पेनुरकर परभणी, नाथाजी लोंढे सोलापूर,अमित परतवाड, ज्ञानेश्वर बेंबडे, तुळशीराम जाधव,प्रताप कोरे, संजय खोचरे,गुरुदत्त महामुनी, बालाजी सैना, अनुश्री सूर्यवंशी, दीपक हालकंचे, विनय बागडे,शितल डोनगापुरे, मच्छिंद्र भोई, रंणजीत वर्मा नांदेड, दिलीप दारव्हेकर हिंगोली, सलीम आत्तार कन्नड,ज्ञानेश्वर इस्तापे कन्नड,
काशिनाथ गावित वैजापूर, वैशाली जायभाये संभाजीनगर,भारती भगत पुणे, शिवार्थ दारव्हेकर,विश्वब्रम्ह विरभद्र सगरोळी,आडेप दत्तात्रय गंगापूर,चंद्रदीप नादरगे,मनिषा कुलकर्णी जळगाव,गणेश कवळासे चाळीसगाव,दिपक सोनवणे कन्नड,नंदकुमार ओतारी,चामले जयमाला उदगीर महादेव खळुरे आदि कलावंतांनी चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला.
सृजन रंगकर्मी दालनाच्या सजावटीसाठी दीपक हालकंचे, चंद्रदीप नागरगे, हनुमंत हेळगिरे, विनय कोरे,बालाजी पांचाळ,महादेव खळुरे यांनी परिश्रम घेतले.दालनास भेटी दिलेल्या सर्व रसीक बांधवांचे,कलावंताचे ऋण व्यक्त करुन संयोजकांने आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!