अहमदपूर तालुक्यात बारावी परीक्षा सुरळीत चालण्यासाठी यंत्रणा सज्ज – परिक्षक बबनराव ढोकाडे

0
अहमदपूर तालुक्यात बारावी परीक्षा सुरळीत चालण्यासाठी यंत्रणा सज्ज - परिक्षक बबनराव ढोकाडे

अहमदपूर तालुक्यात बारावी परीक्षा सुरळीत चालण्यासाठी यंत्रणा सज्ज - परिक्षक बबनराव ढोकाडे

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीचे परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
परिरक्षक कार्यालय अहमदपूर (CU238 )अंतर्गत सहा परीक्षा केंद्रावर एकूण 1815 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर ( केंद्र क्रमांक 551) एकूण 375 विद्यार्थी, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूर (552) एकूण 278 विद्यार्थी,यशवंत कनिष्ठ विद्यालय अहमदपूर (553) एकूण 274 विद्यार्थी,कस्तुरबा गांधी कनिष्ठ विद्यालय अहमदपूर (554) एकूण 238 विद्यार्थी,पोस्ट बेसिक आश्रम शाळा ढाळेगाव (564) एकूण 294 विद्यार्थी, कै.अनुसया गोरटे कनिष्ठ महाविद्यालय तुळशीराम तांडा (356) एकूण 356 विद्यार्थी याप्रमाणे अहमदपूर परिरक्षक कार्यालय अंतर्गत 1815 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
यावेळी केंद्र संचालक म्हणून प्राध्यापक डॉ. हणमंत खिंडीवाले,प्रा.सुधीर कल्लूरकर,प्रा. मुजम्मिल सय्यद,प्रा.उमाकांत पटणे,प्रा.बालाजी घाटीचरले, प्रा.शशिकांत कदम हे आपल्या केंद्रावर सर्व दालनात सीसीटीव्ही कॅमेरासह यंत्रणा सज्ज आहे.
अहमदपूर परिरक्षक कार्यालयात परिरक्षक बबनराव ढोकाडे,उपपरिरक्षक रमाकांत बिलापट्टे,सहाय्यक परिरक्षक प्राध्यापक रमेश चेपुरे,सागर राजपूत, प्रमोद वडवळे,तानाजी केंद्रे,गिरीधर जाधव,प्राध्यापक सोळंके,संदीप कदम,महादेव खळुरे लिपिक विवेक केंद्रे,मदतनीस इकबाल सय्यद अहमद, एम एम पठाण सदरील कर्मचारी कार्यरत आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी)परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देण्यात येत आहेत. त्यानुसार फेब्रु-मार्च 2025 परीक्षेसाठी देखील सकाळ सत्रात सकाळी 11.00 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार असून लगेच लेखनास प्रारंभ होईल. सकाळी 11.00 पूर्वी व दुपारी 3.00 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही याबाबत सक्त केंद्रसंचालक,पर्यवेक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत.परीक्षा दालनात ज्या क्रमाने परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच क्रमांने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना केंद्रसंचालक दिले आहेत.पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी दहा मिनीटे वेळ बोर्डाने विद्यार्थ्यांना वाढवून दिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!