मोजे गुत्ती येथील साठवण तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा द्या – मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) :मौजे गुत्ती येथील साठवण तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्याकडे सौ.चंद्रकला केंद्रे रा. गुत्ती व इतर शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच मागणी केलेली आहे. याची हकिकत अशी की, सौ. चंद्रकला केंद्रे रा. गुत्ती यांची जमीन सर्वे नंबर 65 बटे दोन मधील 53 आर ही जमीन साठवण तलावासाठी यापूर्वी शासनाने संपादित केलेली आहे. याचा कालावधी वीस वर्षाच्या जवळपास झालेला आहे. वेळोवेळी शासन दरबारी अर्ज फाटे करून देखील अद्याप पावेतो मावेजा मिळालेला नाही. त्याच बरोबर इतर शेतकऱ्यांची जमीन पण संपादित केलेली आहे. त्यांना देखील अद्याप पावेतो मोबदला मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे. परंतु उर्वरित 50% शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. ज्या व्यक्तींना मोबदला मिळालेला नाही, ते शेतकरी मावेजा मिळण्यासाठी वंचित राहिलेले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. फडणवीस , यांच्याकडे सविस्तर अर्ज देऊन, मागणी केलेली आहे. तरी या भागातील शेतकऱ्यांना व सौ. चंद्रकला केंद्रे यांना तात्काळ मोबदला मिळावा अशी पण विनंती केलेली आहे. योग्य वेळी मोबदला नाही मिळाल्यास या भागातील वंचित राहिलेले शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. म्हणून शासनाने त्वरित दखल घेऊन, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
