रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे श्रद्धा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार
रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे श्रद्धा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान केले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार वितरित करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
लालबहादूर शास्त्री विद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका डॉ.श्रद्धा पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत श्रिया महामुनी या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले, किरण नेमट, रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
