लातूर, धाराशिव व पुणे येथून चोरी केलेल्या 24 मोटारसायकलीसह आरोपीला अटक. 17 गुन्हे उघड

0
लातूर, धाराशिव व पुणे येथून चोरी केलेल्या 24 मोटारसायकलीसह आरोपीला अटक. 17 गुन्हे उघड

लातूर, धाराशिव व पुणे येथून चोरी केलेल्या 24 मोटारसायकलीसह आरोपीला अटक. 17 गुन्हे उघड

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मोठी कामगिरी करत लातूर, धाराशिव आणि पुणे येथून चोरीस गेलेल्या 24 मोटारसायकली शोधून काढले आहेत. या संदर्भात सतरा मोटरसायकल चोरीचे गुन्हेही उघड झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 10/02/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अमोल नागरवाड त्याने चोरलेल्या मोटारसायकली त्याचे राहते घरासमोर लपवून ठेवलेल्या आहेत.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 10/02/2025 रोजी सदर पथक तात्काळ अहमदपूर तालुक्यातील मौजे थोरलेवाडी येथे पोहचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या अमोल तेजराव नागरवाड, (वय 25 वर्ष) याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल ह्या लातूर, धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने चोरलेल्या मोटरसायकल वरून सदरच्या मोटरसायकली ह्या लातूर, पुणे व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण 24 मोटरसायकली ज्याची किंमत 08 लाख 20 हजार रुपये असा असून त्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे चाकूर येथील 4, पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथील 3 मोटरसायकल, पोलीस ठाणे रेणापूर, देवणी, निलंगा, विवेकानंद, गांधी चौक, अहमदपूर येथील प्रत्येकी 1 मोटरसायकल तर पुणे जिल्ह्यातील 3 व धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 17 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरित सात मोटारसायकल संदर्भात तपास सुरू आहे.
नमूद आरोपीला पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथका मधील उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, युवराज गिरी, मनोज खोसे, गोविंद भोसले, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!