लोकसंस्कृती साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत शांतिनिकेतन विद्यालयाचा सहभाग

0
लोकसंस्कृती साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत शांतिनिकेतन विद्यालयाचा सहभाग

लोकसंस्कृती साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत शांतिनिकेतन विद्यालयाचा सहभाग

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे लोकसंस्कृती साहित्य संमेलन उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनात सकाळी आठ वाजता अण्णाभाऊ साठे चौक ते शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या ग्रंथदिंडीत उदगीर तालुक्यातील कोदळी येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला व महिला सुरक्षा काळाची गरज या विषयावर समाज प्रबोधनपर पथनाट्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
या संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे, संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक देविदासराव फुलारी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, शिक्षिका हे उपस्थित होते.
या विद्यार्थिनीकडून सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी तयारी करुन घेतली. मुख्याध्यापक राजेंद्रकुमार भोसले, सेवानिवृत्त माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील यांनी मार्गदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!