सिध्दी शुगर अँन्ड अॅलाईड इंड. लि. कारखान्याच्या वतीने ऊस पिक परिसंवाद व खत प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

0
सिध्दी शुगर अँन्ड अॅलाईड इंड. लि. कारखान्याच्या वतीने ऊस पिक परिसंवाद व खत प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

सिध्दी शुगर अँन्ड अॅलाईड इंड. लि. कारखान्याच्या वतीने ऊस पिक परिसंवाद व खत प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : सिद्धी शुगर ॲड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेशनगर उजना, डि. जी. अॅग्रो न्युटेन्टस प्रा. लि., इतर विविध खत कंपनी, व राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र , अहमदपूर यांच्या संयूक विद्यमाने मंगळवार दि.११/०२/२०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मंचकराव पाटील साहेब यांच्या शेतावर ऊस उत्पादक शेतकरी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास माजी अभियंता व आदर्श शेतकरी श्री.साहेबराव जाधव यांनी अध्यक्ष स्थान भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री.मंचकराव पाटील, व सिद्धी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट श्री पी.जी. होनराव साहेब, डी .जी. अॅग्रोन्युट्रीन्टंस प्रा.लि. चे प्रतिनिधी श्री.मनोज आडे, एस. के.आर. अॅग्रोटेक, वर्धा चे प्रतिनिधी श्री.बालाजी वाघमारे, गुरुकृपा अँग्रो इंडस्ट्रीज फलटन चे प्रतिनिधी श्री.रंधवा शेखापूरे, इमराल्ड इरा अँग्रो कोल्हापूर चे प्रतिनिधी श्री.जगदीश लोमटे, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच सदर कार्यक्रमास आदर्श शेतकरी श्री.बालाजी गुंडरे, श्री.दत्तात्रय जवळगे, ग्राम पंचायत सदस्य प्रा.श्री.किसन कापसे, श्री.किशन पाटील, संचालक (कृषी उत्पन्न बाजार समिती),श्री.दिलीप वलसे (चेअरमन सेवा सहकारी सोसायटी), व श्री.माधव पवार, संचालक (कृषी उत्पन्न बाजार समिती) व शिरूर ताजबंद व शिरूर पंचक्रोशितील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धी शुगरचे ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, यांनी केले. यावेळी शेतकऱ्याना विविध कंपनीचे प्रतिनिधीने खतांची- ऊस लागवड व खत व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन तसेच शेंद्रीय खत व सूक्ष्म अन्न द्रव्य ऊसास वापरले मुळे होणारे ऊस उत्पादनात वाढ व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सिद्धी शुगरचे जनरल मँनेजर (केन) श्री.पी.एल. मिटकर साहेब, यांनी ऊस पिकासाठी आवश्यक माती परीक्षण, ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यासाठी ऊस लागवडीसाठी पाच फुट सरी पद्धतीने लागवड करावी. तसेच खोडवा उसाचे संगोपन करते वेळी पाचट न जाळता पाचट अच्छादान करून त्याचा शेंद्रीय खत म्हणून वापर करावा, रासायनिक खाताचा अनावश्यक वापर टाळून त्याबरोबर प्रेसमड, शेंद्रीय खत व सूक्ष्म अन्न द्रव्य खताचा समतोल वापरा बरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे ऊस उत्पादकांना आव्हान केले.
कंपनीच्या प्रतिनिधींनी विविध खतांची माहीती देवून प्रात्याक्षिक करुन दाखवले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र अहमदपूरचे संचालक शिवाजी पाटील, सिद्धी शुगर चे शेतकी विभागाचे व ऊस विकासचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!