छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारी पासून ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ

0
छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारी पासून ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ

छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारी पासून ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठवाड्यातील साहित्य : नवे भान, नव्या वाटा ‘ विषयावर पार पडणार परिसंवाद

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती संभाजीनगर वाळूज येथील दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभाग व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून, ‘मराठवाड्यातील साहित्य: नवे भान, नव्या वाटा ‘ हा परिसंवाद ज्येष्ठ समीक्षक तथा ललित लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दोन दिवस चालणाऱ्या ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भीमराव वाघचौरे हे असून, महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभाग व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री नामदार अतुल सावे, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या संमेलनात सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद जातीची की मतांची, त्याचबरोबर मराठवाड्यातील साहित्य: नवे भान, नव्या वाटा, भारतीय संविधान , सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल आदी परिसंवादासह मुलाखत, बाल साहित्य संमेलन,ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकथन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यातील ‘मराठवाड्यातील साहित्य : नवे भान, नव्या वाटा’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक तथा सुप्रसिद्ध ललित लेखक अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे असून या परिसंवादामध्ये डॉ. महेश खरात (वैजापूर ), डॉ. वैजनाथ अनमूलवाड (नांदेड ), डॉ. मुंजाभाऊ धोंडगे (सोनपेठ ), डॉ. सुरेंद्र पाटील ( लामजाना ), डॉ. रमेश रावळकर (छत्रपती संभाजीनगर ) आदी विचारवंत मान्यवर सहभागी होणार आहेत.
या साहित्य संमेलनाचा समारोप दि. १६ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भीमराव वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे तसेच प्रसिद्ध कवी व चित्रपट पथकथा लेखक अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष विजय राऊत यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, सह कार्यवह डॉ. गणेश मोहिते, सह कार्यवाह डॉ. दीपा क्षीरसागर आदींनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!