प्रथमिक शाळा परचंडा येथील अंकिता रड्डेवाड एनएमएमएस परीक्षेत अव्वल

0
प्रथमिक शाळा परचंडा येथील अंकिता रड्डेवाड एनएमएमएस परीक्षेत अव्वल

प्रथमिक शाळा परचंडा येथील अंकिता रड्डेवाड एनएमएमएस परीक्षेत अव्वल

अहमदपुर (गोविंद काळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परचंडा येथील विद्यार्थिनी कु. रड्डेवाड अंकिता हरिदास हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक छात्रवृत्ती परीक्षा (NMMS) उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक, दिलीपराव रोकडे, शिक्षकवृंद भारत घोगरे, प्रभाकर कांबळे, बाळासाहेब पाटील, गजानन पांचाळ ,हारुबाई बिराजदार, सुरेखा मरवले, .सुप्रभा कतुरे., पठाण ईर्षाद,अर्चना कानेकर,कदम मँडम,पठाण मँडम आदर्श सरपंच शिवनंदाताई हिप्परगे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधवआणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तिच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, तिची मेहनत महत्त्वाची ठरली..
या यशाबद्दल संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही विद्यार्थी अशीच उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास केंद्रपमुख शादुल शेख यांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!