मालवाहु ट्रकची मोटार सायकलला जोराची धडक एकचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

0
मालवाहु ट्रकची मोटार सायकलला जोराची धडक एकचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

मालवाहु ट्रकची मोटार सायकलला जोराची धडक एकचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील थोरलेवाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची व मोटारसायकलची दि 11 फेब्रुवारी रोजी मंगळवारी अंदाजे दुपारी 12.00 वाजता सामोरा समोर जोराची धडक झाली आहे यात मोटारसायकल वरील 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाला असुन एक 32 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील थोरलेवाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर माल वाहतूक करणारी टाटा कंपनीची भरधाव वेगाने जाणारी MH 26 BE 7011 नंबरची ट्रक लातूरहून अहमदपूर कडे माल घेऊन येत असताना अहमदपूर कडून शिरुताजबंद कडे जाणारी MH 24 Y 7901 क्रमांकाची मोटार सायकल यांची दि 11 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 12 .00 वाजता सामोरा समोर जोराची धडक झाली यात मोटार सायकल वरील विजय शेषेराव सोमवंशी वय 35 वर्षे रा नांदुरा खु ता अहमदपूर या युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे तर
अमर बाबुराव पुट्टेवाड वय 32 वर्षे रा नांदुरा बु ता अहमदपूर हा युवक गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे
सदरील घटनेची अहमदपूर पोलीसांना माहिती समजताच घटनास्थळी अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आय पि एस अधिकारी सागर खराडे, पोलीस निरिक्षक भुसनुर पोलीस उपनिरिक्षक श्रीमंगल चालक केंद्रे आदींनी भेट दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!