आ.डाॅ.तुषारजी राठैड यांच्या उत्तर मराठवाडा प्रादेशाक विभाग कार्यालयास सदिच्छा भेटीने ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटतील – डाॅ.हंसराज वैद्य
आ.डाॅ.तुषारजी राठैड यांच्या उत्तर मराठवाडा प्रादेशाक विभाग कार्यालयास सदिच्छा भेटीने ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटतील - डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड (एल.पी. उगीले) : मुखेड विधान सभा मतदार संघाचे नव निर्वाचित आ. डाॅ.तुषारजी राठोड यांनी ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग कार्यालय वैद्य रुग्णालय परिसर नांदेडला अचानक भेट देउन आपल्या कर्तव्य तत्परतेची व ज्येष्ठ नागरिकांप्रति असलेल्या प्रेम,जिव्हाळा तथा आस्थेची जाणीव करून दिली आहे. आमदारांची ही भूमिका निश्चितच ज्येष्ठ नागरिकाप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा स्पष्ट दिसून येतो. असे विचार समाजसेवक तथा नामांकित तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांनी व्यक्त केले आहेत.
अत्यंत आस्थेने ज्येष्ठ नागरिकाचे प्रलंबित प्रश्न,गांभिर्याने व शांत पणे ऐकून घेऊन ते राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपूरावा करून सोडवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे व ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. देशाला ज्येष्ठ नागरिकांमुळेच खरे वैभव प्राप्त झालेले आहे.ते राज्याचेच नव्हे तर राष्ट्राचे खरे “शिल्पकार” व राष्ट्राची खरी “संपत्ती”ही तेच आहेत.सरसकट नाही तर जे गरजवंत, दुर्लक्षित, वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता,निराधार तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना तरी आता त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्यात “सन्मान धन”तथा “मानधन” मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी मी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळऊन देण्यासाठी विधान सभेत “लक्षवेधी तथा तारांकित प्रश्न”ही करेन असे आश्वासनही आमदार राठोड यांनी याप्रसंगी दिले.
फेस्काॅमच्या “गाव तिथे संघ स्थापना व प्रबोधन” चळवळीची त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली! कांही दिवसातच ज्येष्ठ नागरिकांची ही चळवळ सर्व सामान्य जनतेची “जन चळवळ” होईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आ. राठोड यांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने निवेदनही देण्यात आले. सदरील निवेदनावर डाॅ.हंसराज वैद्य,प्रभाकर कुंटूरकर ,गिरिष बार्हाळे व डाॅ लक्ष्मी पुरणशेट्टीवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
