शिवाजी महाविद्यालयाचे जेईई मुख्य परीक्षेत घवघवीत यश
शिवाजी महाविद्यालयाचे जेईई मुख्य परीक्षेत घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये प्राची राजविक्रम बिरादार 97.46 महाविद्यालयामधून सर्वप्रथम,कोनाळे पूनम दत्तात्रय 85.96 द्वितीय, गुरनाळे अनिकेत विष्णुदास यांनी 80.86% पर्सेंटाइल घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, संस्थेचे सचिव पी टी शिंदे, सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक जी.जी.सूर्यवंशी व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
