फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

0
फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

लातूर (एल.पी.उगीले) : मुलगीला दीड वर्षापासून फराळ असलेल्या आरोपीला अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे दि.17/01/2024 रोजी लातूर शहरातील एका सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल चे चालक डॉक्टरांनी तक्रार दिली की, दि.26/06/2023 रोजी त्यांनी त्यांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल मधील 10,44,000/- रुपयाचे उपकरणे दुरुस्ती करीता संतोष मुरादे (रा.ओमकार हाईट्स फ्लॅट नं. 34 बसस्टैंड, बीड) याला दिली होती. परंतु त्यांनी सदर उपकरणे परत न करता परस्पर विल्हेवाट लावली. सदर तक्रारी वरून नमूद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुरनं 31/2024 कलम 406 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच नमूद गुन्हयातील आरोपी त्याचे राहते पत्त्यावरून निघून गेला. तेव्हा पासून तो नेहमी त्याचे राहण्याचे ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक नमूद आरोपीचा विविध मार्गाने शोध घेत होते. दरम्यान पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाला नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक आक्रम मोमीन यांचे पथकातील पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, शिवा पाटील, संतोष गिरी, शैलेश सुडे (सायबर सेल) हे आरोपीचा शोध कामी तात्काळ अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये रवाना झाले. दि.11/02/2025 रोजी अहिल्यादेवी नगर येथील पवन नगर येथून ताब्यात घेतले व पुढील तपासकामी पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर येथे हजर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!