राष्ट्रीय उत्पादकता दिनानिमित्त श्री पांडूरंग विद्यालयात कागदी पिशवी निर्मिती उपक्रम
राष्ट्रीय उत्पादकता दिनानिमित्त श्री पांडूरंग विद्यालयात कागदी पिशवी निर्मिती उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय उत्पादकता दिनानिमित्त श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथे कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 6 वी च्या विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्यांची निर्मिती हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक उत्पादन वाढवणे आणि प्लास्टिक मुक्त समाजाची जाणीव निर्माण करणे, हा होता.
कालाशिक्षकांनी राष्ट्रीय उत्पादकता दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवून एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे. केवळ उद्योग आणि सेवाक्षेत्रच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही उत्पादकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.” विद्यार्थ्यांनी कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाने रंगीत कागदांचा उपयोग करून टिकाऊ आणि मजबूत पिशव्या तयार केल्या. या पिशव्यांवर पर्यावरणपूरक आशयाचे संदेश लिहिण्यात आले. या उपक्रमाची उद्दीष्ठे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्ये आणि सर्जनशीलता विकसित करणे. प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत सजगता निर्माण करणे.पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर वाढवणे. राष्ट्रीय उत्पादकता दिनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जवळपास 35 हून अधिक विद्यार्थ्यांनि कागदी पिशव्या तयार करून स्थानिक दुकाने आणि पालकांना वितरित केल्या.
काही विद्यार्थ्यांनी या पिशव्यांवर स्वतःच्या कलाकृती आणि पर्यावरणपूरक संदेश लिहून त्या आकर्षक बनवल्या. मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. या उपक्रमामुळे स्थानिक दुकानदार आणि पालक वर्गाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. काही पालकांनी अशा प्रकारच्या पिशव्यांचा नियमित वापर करण्याचा संकल्प केला. या स्तुत्य उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी उत्पादकतेचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन समजून घेतला. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा कलाशिक्षकांचा संकल्प असून, विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरला.
