महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी राहुल रक्षाळे लोहारकर यांची निवड
महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी राहुल रक्षाळे लोहारकर यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन पालघर व मुंबई येथे करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उदगीर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा महा ई सेवा उदगीर केंद्राचे संचालक राहुल रक्षाळे यांच्या कामाची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून संतोष भावानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सदरील नियुक्ती पत्र विनोद तायडे, शैलेन्द्र भोईटे, यशवंत गावंडे,
रियाज तांबोळी, कुंदन कोरडे, जयश पाटील व कामिनी रानडे यांच्या
उपस्थितीत देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील महा ई सेवा व आधार केंद्र पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.बैठकीमध्ये महा ई सेवा व आधार केंद्रांसमोरील अडचणी, सवलती,शासन धोरणे आणि भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा करण्यात आली.लातुर जिल्ह्यातील केंद्राचालकाच्या न्याय व हक्कासाठी
संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करणार, तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सेवा
पुरवणार असे विचार सुहास पंडित यांनी मांडले.
कार्यक्रमास राज्यातील विविध जिल्हयातील संघटनेचे राज्यप्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष व महा ई सेवा केंद्राचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल राहुल रक्षाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
