आशा काळे(बडगे) राज्यस्तरीय रंगकर्मी साहित्य कला क्रिडा पुरस्काराने सन्मानित

0
आशा काळे(बडगे) राज्यस्तरीय रंगकर्मी साहित्य कला क्रिडा पुरस्काराने सन्मानित

आशा काळे(बडगे) राज्यस्तरीय रंगकर्मी साहित्य कला क्रिडा पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीरात 3 रे लोकसंस्कृती साहित्य संमेलन 2025 आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिंना रंगकर्मी साहित्य कला क्रिडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी शेल्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती आशा सुर्यकांत काळे (बडगे) यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, संमेलनाचे उद्घाटक माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड, सचिव ज्योती मद्देवाड व उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन रंगकर्मी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बद्दल आशा काळे यांचे सर्व स्तरातील मित्र मंडळी, शिक्षक, शाळेतील सहकारी, मुख्याध्यापीका अंजली स्वामी, शाळेतील शिक्षिका मंगल केंद्रे, सोजर जांभळे, कावेरी पांचाळ, पांडुरंग पेठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप चिखले आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!