श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज – बालाजी मुस्कावाड

0
श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज - बालाजी मुस्कावाड

श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज - बालाजी मुस्कावाड

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात महाराष्ट्रातील महान संत ,कवी, अध्यात्मिक गुरु ,समाज प्रबोधनकार म्हणून परिचयाचे असलेले संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड म्हणाले , श्रमात देव शोधणारे संत म्हणजेच संत रोहिदास महाराज होत.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, विभाग प्रमुख विलास शिंदे, नागेश पंगू, श्रीकांत देवणीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
पूढे बोलताना बालाजी मुस्कावाड म्हणाले, योगी बनून समाजापासून विन्मुख होण्यापेक्षा भक्त बनून समाजात मिसळून जावे , अशी भूमिका मांडत , श्रमात देव शोधणारे संत म्हणून परिचयाचे असलेले महान कवी म्हणजेच रोहिदास महाराज होत असे सांगितले.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, संत रोहिदास महाराज यांना लहानपणापासून भजन ,कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती. संपूर्ण आयुष्य जातीवर आधारित विषमतावादी समाज व्यवस्था बदलण्यासाठी खर्ची घातली. तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा , जाती आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावी, अशी त्यांची विचारधारा होती.
विद्यालयातील विद्यार्थी गणेश ढाकणे, आर्यन जाधव ,साई सांगवे, रेवणनाथ मनसटवाड, शेखर साबणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख विलास शिंदे यांनी केले तर आभार श्रीकांत देवणीकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, प्रल्हाद येवरीकर, विजय कावळे, उमाकांत नादरगे, विनायक करेवाड, मारोती मारकवाड यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!