छत्रपती शिवाजी महाराज जंयतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

0
छत्रपती शिवाजी महाराज जंयतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जंयतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यामध्ये दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणाऱ्या शिवजंयतीच्या अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टिने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय,लातूर येथे लातूर शहरातील प्रमुख जयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत बैठक पार पडली.
सदर बैठकीस पोलीस उपाधीक्षक (गृह) गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर तसेच शहरातील पाचही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, दिलीप सागर, साहेबराव नरवाडे, पाटील, अरविंद पवार व पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर अधिकारी हजर होते. सदर बैठकीत जंयती मंडाळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे कडून उत्सव अनुषांगाने आयोजित कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या समस्यां बाबत चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस प्रशानाकडून जिल्ह्यातील जयंती उत्सव मंडळ व नागरीकांना आवाहन

सोमय मुंडे यांनी आवाहन केले आहे की, सध्या इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांची परीक्षा चालु असुन आयोजित कार्यक्रमांमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची जाणीव ठेवून कार्यक्रम साजरे करावते.तसेच ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी.जयंती उत्सव दरम्यान अचानक एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची प्रशासनास माहिती द्यावी.
मोटरसायकल रॅली मध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुका ह्या डॉल्बी विरहीत, पारंपारीक वाद्याचा वापर करुन दिलेल्या मार्गानेच व नेमुण दिलेल्या वेळेच्या आत शांततेत पुर्ण करव्यात. दरवर्षी प्रमाणे जयंती उत्सव विधायक कार्यक्रम करुन साजरा करण्यात येईल. उत्सव समिती, नागरीक व पोलीस यांचे समन्वयाने शिवजयंती उत्सव जिल्हाभरात उत्साहात व शांततेत पार पडेल अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केली.
सदर बैठकीस लातूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक,शांतता कमिटीचे सदस्य,शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!