आनंदवाडी (काळेगाव) ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकीची जाण; अखंड हरिनाम सप्ताहात ४९ बाटल्यांचे रक्त संकलन

0
आनंदवाडी (काळेगाव) ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकीची जाण; अखंड हरिनाम सप्ताहात ४९ बाटल्यांचे रक्त संकलन

आनंदवाडी (काळेगाव) ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकीची जाण; अखंड हरिनाम सप्ताहात ४९ बाटल्यांचे रक्त संकलन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील आनंदवाडी ( काळेगाव ) येथे श्री संत शेषेराव महाराज अखंड हरिनाम सप्ताह व ह.भ.प विजयानंद महाराज सुपेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या ७५ वे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबीर, मोफत मदुमेह ( शुगर ) बिपि तपासणी उपचार शिबीराचे आयोजन संत भगवान बाबा युवक मंडळ यांच्या वतीने दि १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या रक्तदान शिबीरात ४९ रक्त दात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधीलकी दाखवुन दिली

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी (काळेगाव ) येथील ग्रामस्थांनी श्री संत शेषेराव महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दि ८ फेब्रुवारी पासुन सुरवात झालेल्या सप्ताहाची सांगता दि १५ फेब्रुवारी होणार आहे या या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीपद् भागवत कथा, गाथाभजन , हरिपाठ , किर्तन, हरिजागर , असे दैनदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत
अखंड हरिनाम सप्ताहाचे यावर्षी ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष तसेच ह.भ.प विजयानंद महाराज सुपेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आपणही समाजाचे काही देणे लागतो रक्तदान करणे हे एक श्रेष्ठदान आहे रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवता येतात या भावनेने दि १३ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर, मोफत मदुमेह ( शुगर ) बिपि तपासणी उपचार शिबीराचे आयोजन संत भगवान बाबा युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते
डॉ. तुकाराम नलवाड यांनी गावातील जळपास २०० ते ३०० महीला तसेच परूष यांची मदुमेह ( शुगर ) बिपि तपासणी करून उपचार व समुपदेशन केले या रक्तदान शिबीरात नागरीकांनी सहभाग घेऊन ४९ रक्त दात्यांनी रक्तदान करत आध्यात्माला विज्ञानाची जोड देत सामाजिक बांधीलकी दाखवुन दिली असुन या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
रक्तदान व आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी अहमदपूर बाजार समितीचे संचालक यशवंत केंद्रे मित्रमंडळ व समस्थ आनंदवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले रक्त संकलन इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा लातुर संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर यांच्या वतीने करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!