तिरू मध्यम प्रकल्पावरील तलाव आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा – आ. बनसोडे यांची मागणी
तिरू मध्यम प्रकल्पावरील तलाव आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - आ. बनसोडे यांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : विधानसभा मतदार संघातील उदगीर तालुक्यातील मौ. चिमाचीवाडी तिरु मध्यम प्रकल्पाची निर्मिती साधारणतः ५० वर्षापूर्वी झाली आहे. त्यामुळे सदरील प्रकल्पाच्याही कालव्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच उदगीर तालुक्यातील करखेली, बामाजीची वाडी, निडेबन, चांदेगाव, गुत्ती-१, गुत्ती-२, धोंडवाडी, डावुळ, कोदळी, एकुर्का, केसगरवाडी, केकतसिंदगी, हावरगा, चेरा-१ व चेरा-२, जंगमवाडी, देवर्जन हे सर्व साठवण तलाव व यातील बरेच साठवण तलाव हे मागील २९-३० वर्षापूर्वी तयार झाले असून या साठवण तलावांची दुरुस्ती करणे गरजेचे असून सदरील ठिकाणच्या जोड रस्त्यांचीही आवस्था ही अत्यंत खराब झाली असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वाहतूकीसाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील सदरील रस्ते व साठवण तालावाची दुरुस्ती व कालव्यांची दुरुस्ती करण्याबाबत निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना सोयीचे होईल अशी लेखी मागणी उदगीर – जळकोट मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
आ.संजय बनसोडे यांच्या मागणीला ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल असा विश्वास आ.बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
