संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन

0
संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन

संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : संत रविदास जयंतीनिमित्त श्री संत रविदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार सामाजिक सेवाभावी संस्था शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात शिवशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निडेबन-उदगीर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीर, लातूर जिल्हा युवक कुणबी मंडळ उदगीर- अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने कार्यालयात व मुख्यालयात संत रविदास यांच्या तैलचित्राला शिवशांतीच्या अध्यक्षा चंचलाताई शिवाजीराव हुगे, दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सुनिता बालाजी माने, चंद्रभागा मधुकर वाघमारे, ललिता राम माने, मधुकर उद्धवराव वाघमारे, शिवराज खंडाजी कांबळे, ललिता सूर्यकांत मिंचे, महाराष्ट्र शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.संध्या बालासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाचे अध्यक्षा सौ. रुक्मीन पांडुरंगराव सोमवंशी, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्षा मयुरी बालासाहेब शिंदे, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर संत रविदास यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना म्हणाले की, जीवनासाठी दिशादर्शक आहेत संत रविदास यांचे विचार असून आपले जीवन योग्य मार्गावर चालण्यासाठी संतांचे विचार खूप उपयुक्त ठरतात. असेच संत रविदास यांचे विचार आजच्या काळातही जीवनासाठी दिशादर्शक आहेत. संत रविदास जयंती निमित्त त्यांचे हे विचार खुपच प्रेरणादायी आहेत. भारतात अनेक संत होऊन गेलेत. शरीर रुपाने जरी ते नसले तरी त्यांच्या अमुल्य अशा विचारांच्या रुपाने ते आजही समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. माघी पौर्णिमेला काशीच्या मंडुआडीह गावातील रघू आणि कर्माबाई यांचे पुत्र म्हणून जन्माला आलेल्या या विभूतीने चर्मकाराचा वडिलोपार्जित व्यवसाय निवडला. पण त्यांनी आपल्या रचनांनी, विचारांनी ज्या समाजाचा पाया रचला तो खरोखरच अद्भूत आहे. माणसाची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते. भ्रमात अडकलेला जीव भटकत राहतो. कधीही अभिमानाला जन्म घेऊ देऊ नका, असा उपदेश केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!