चिमुकल्याच्या नृत्यविष्कारांनी पालक मंत्रमुग्ध
चिमुकल्याच्या नृत्यविष्कारांनी पालक मंत्रमुग्ध
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरालगत असलेल्या मादलापूर नवीन वसाहत येथील जि. प. प्रा. शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. लहान बालक चिमुकल्यानी विविध पोशाख परिधान करून नृत्य सादर करून पालकांसह उपस्थितीतांची मने जिंकली. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ निवृत्त शिक्षक विश्वनाथ मुडपे, व्ही.एस.कुलकर्णी, उपसरपंच डॉ.दत्ता पाटील, पोलीस पाटील अंकुश चव्हाण, ग्राम पंचायत अधिकारी वैजनाथ मोरतळे ,आदर्श मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी, आदर्श योग शिक्षिका अनिता संकाये, यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका लेखिका सुनंदा सरदार – कुलकर्णी यांनी केले.यावेळी चिमूकल्या विद्यार्थ्यांनी बालगीत,आदिवासी नृत्य, वासुदेव गीत, लावणी,कोळी गीत, देशभक्तीपर गीत अशी विविध गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सहशिक्षिका बालिका कोचेवाड शिक्षण सहाय्यक योगेश्वरी धडेवाड मादलापूर शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश मद्रेवार व शिक्षण सहाय्यक सुरज गरगटे ,अंगणवाडीताई सुप्रिया शिंदे यांनी पुढाकार घेतला.
