सक्सेस कोचिंग क्लासेसच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
सक्सेस कोचिंग क्लासेसच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सक्सेस कोचिंग क्लासेसच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील चौबरा रोड परिसरातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सक्सेस कोचिंग क्लासेस येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार गुरुकुल चे सर्वेसर्वा संचालक संस्थापक प्रा.सचिन वाघमारे यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांगीण विकासासाठी गुरु मंत्र दिला. चिकाटी, जिद्द मेहनत या सदगुणांची त्रिसूत्री आपल्या जीवनात अवलंबली तर आपल्याला नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, परीक्षा पॅड व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालक, अध्यक्ष पवन , श्रीमठपती, सोनिया तसेच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन कु.सुप्रिया कांबळे यांनी केले तर कु.वैष्णवी गवारे यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!