मालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची जप्ती मोहिम

0
मालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची जप्ती मोहिम

मालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची जप्ती मोहिममालमत्ता कर वसूलीसाठी मनपाची जप्ती मोहिम

लातूर (प्रतिनिधी) : कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने विविध सुट योजना देऊनही काही थकबाकीदार टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर मनपा मार्फत धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यलय ए, बी, सी, डी च्या कार्यक्षेत्रात मालमत्ताकर व पाणी पट्टी कराच्या वसूलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वसूली पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली आहे.
क्षेत्र क्रं. ए:- थकीत मालमत्ताकर ३७२४३७ रुपये, ३ नळ जोडणी बंद करण्यात आले. तसेच ८१८३७ रुपये थकीत कर वसूलीसाठी एक दुकान सील करण्यात आले. क्षेत्र क्रं.बी:- थकीत मालमत्ताकर २४४७१९ रुपये दोन गोडाऊन सीलची कार्यवाही करण्यात आली. क्षेत्र क्रं.सी:- थकीत मालमत्ताकर व पाणी पट्टी कर ७३१२९९ रुपये वसूलीसाठी एकूण १३ नळ जोडणी बंद करण्यात आले. क्षेत्र क्रं.डी:- थकीत मालमत्ताकर व पाणी पट्टी कर २७४२७२ रुपये वसूलीसाठी एकूण ३ नळ जोडणी बंद करण्यात आले.
या पुढेही थकीत कराच्या वसूलीसाठी नियुक्त पथकामार्फत जप्तीची कार्यवाही तिव्र करण्यात येणार असून सदर कार्यवाही अंतर्गत मालमत्ता सील करणे, आटकाव करणे, नळ कनेक्शन बंद करणे, इत्यादी कार्यवाही करण्यात येणार असून मालमत्ता जप्त किंवा सील करून मुदतीत मालमत्ता धारकांनी कर भरणा न केल्यास अशा मालमत्ताधारकांच्या मालमतेचा लिलाव, विक्री करून कर वसूल करण्यात येणार आहे. तरी व्याज, शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे देय असलेल्या कराचा भरणा करावा. व जप्ती सारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसुल) डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!