माऊली ग्रुपच्यावतीने शिवाजीराव हुडे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान, मोफत नेत्र व मधूमेह तपासणी शिबिर
माऊली ग्रुपच्यावतीने शिवाजीराव हुडे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान, मोफत नेत्र व मधूमेह तपासणी शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या वाढदिवसा निमित्य माऊली ग्रुप उदगीरच्या वतीने शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान, मोफत नेत्र व मधूमेह तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या माऊली ग्रुपच्यावतीने ग्रुपचे सदस्य तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश मंदिर आडत बाजार येथे सकाळी 10 वाजता कै.नागप्पा अंबरखाने ब्लड बॅंकेच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी तर मधूर मधुमेह डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने मोफत मधूमेह तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करुन रक्तदानाच्या राष्ट्रिय,सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा. तसेच मोफत नेत्र व मधूमेह तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन माऊली ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत डोईजोडे, सचिव मनोज शिवनखेडे राम मोतीपवळे व सदस्यांनी केले आहे.
