जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनाळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2025 संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनाळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2025 संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनाळी ता.देवणी जि.लातूर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन गटविकास अधिकारी देवणी सागर वरंडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अंजली पद्यमाकर पाटील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोनाळी ह्या होत्या.प्रमुख अतिथी दशरथ माने सरपंच कोनाळी,रामदास बिरादार उपसरपंच कोनाळी,शांता लोहारे प्र.केंद्रप्रमुख विळेगाव, रामेश्वर बिरादार उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोनाळी, ईश्वर मुर्के ग्रामपंचायत अधिकारी कोनाळी,रोकडे नरसिंग मुख्याध्यापक कोनाळी. बबन बिरादार सहशिक्षक माधवराव माडीवाले कोनाळी,शाळा व्यस्थापन समिती सर्व पदाधिकारी , सर्व शिक्षक वृंद कोनाळी उपस्थित होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रतिमा पुजनानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पहाराने स्वागत सत्कार करण्यात आले.
बाल चमूने उपस्थितांचे स्वागत गीताने नृत्य सादर करुन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी टिळे यांनी केले.
यावेळी उदघाटक सागर वरंडेकर गटविकास अधिकारी देवणी यांनी बाल चिमुकल्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करुन कलाविष्कार सादर करण्याची संधी दिल्याबद्यल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.व वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी खुप शुभेच्छा दिल्या.
यावेळी विळेगाव केंद्राच्या प्र.केंद्रप्रमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. इंग्रजी शाळेपेक्षा आपली जिल्हा परिषदेची शाळा काय कमी आहे. आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकली पाहीजेत.गुणवंत शिक्षक जि.प.शाळेत नेमलेले असतात ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करु शकतात. यावेळी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनातील बाल कलाकारांचे नृत्य,कलाविष्कार पाहून प्रशंसा केली.
अध्यक्षीय समारोप सौ.अंजली पद्यमाकर पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.असे कार्यक्रम शाळेत झाले पाहीजेत यामुळे विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना व्यक्त करण्याची संधी मिळते असे मत व्यक्त केले.
वार्षिक स्नेहसंमेलनात 44 गाणे व सावित्री तू शिक आणि जैशी करणी वैशी भरणी या नाटकांचा समावेश होता.स्नेह संमेलनातून अंधश्रध्दा, वैज्ञानिक दृष्टीकोन,मुलगी शिकली पाहीजे,हुंडा बळी,मोबाईल चा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम,साक्षरता ,व्यसनाधिनते पासून दूर राहीले पाहीजे,अशा अनेक विषयावर प्रबोधन करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीते काही रिमिक्स, मनोरंजक गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले.कार्यक्रम 5 तास चालला. वार्षिक स्नेह कार्यक्रमास पालक,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणेसाठी भरभरुन बक्षिस दिले.यामुळे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
सुत्रसंचलन तालुका शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती सय्यद रेशमा यांनी केले.आभार प्रदर्शन शिवाजी टिळे यांनी
कार्यक्रम यशस्वितेसाठी गणेश बेळकट्टे, बाबु भंडे,श्रीमती अदीती टाकेकर यांनी परिश्रम घेतले.
