राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी

0
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : सर्वांना समान न्याय यांनी पोटभर अन्न मिळेल कोणताही भेदभाव राहणार नाही अशा समाजाची निर्मिती झाल्यास रविदास प्रसन्न राहील, असा देशाला संदेश देणारे समानतेचे तत्त्व मांडणारे, जगातील पहिले संत, महान क्रांतिकारक, समाज सुधारक, कुलभूषण, आधुनिक व्यक्तिमत्व, चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हा ग्रामीण संपर्क कार्यालय, उदगीर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकरराव वाघमारे, उदगीर तालुकाध्यक्ष प्रा. सुधीर नाबदे, तालुका कोषाध्यक्ष पंडितराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुरेश झिल्ले, सुनील गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष माधव कल्याणकर, युवक कोषाध्यक्ष धनंजय लोहकरे, शहर उपाध्यक्ष बालाजी अंबादास माने, युवक शहर सहसचिव गणेश कांबळे, शिक्षक आघाडी उदगीर तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, अतुल वाघमारे, मोहन कांबळे, बालाजी वाघमारे, बालाजी राम माने व शिवराज कांबळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर वाघमारे यांनी केले तर आभार उदगीर तालुकाध्यक्ष प्रा. सुधीर नाबदे यांनी मानले. या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ उदगीर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!