जगाला संतांचे विचार आचरणात आणण्याची खूप गरज आहे – ह. भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळे

0
जगाला संतांचे विचार आचरणात आणण्याची खूप गरज आहे - ह. भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळे

जगाला संतांचे विचार आचरणात आणण्याची खूप गरज आहे - ह. भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळे

उदगीर (एल.पी.उगीले) : जगाला वारकरी, संत महात्म्यांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. संतांचे विचार जो अंगी बाणेल, स्वीकारेल तोच या जीवनात सुखी बनेल. संत म्हणजे राष्ट्राचा प्राणवायूच, संतांनी केलेले उपकार शब्दात सांगता येत नाहीत. ते ग्रंथातूनच मांडावे लागतात, असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळे उदगीरकर यांनी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र टेंभुर्णी ता. अहमदपूर येथील सप्ताहात केले.
श्रीक्षेत्र टेंभुर्णी येथे 14 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा “काय सांगू आता संतांचे उपकार” या प्रस्तुत अभंगावर त्यांनी सादर केली. या कीर्तनासाठी गायक म्हणून ह. भ. प.साईनाथ महाराज लंगडे टेंभुर्णी, ह. भ. प.अरुण महाराज तुळजापूर, भागवत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह भ प,अशोकराव माने महाराज, टेंभुर्णी येथील भाविक वारकरी मंडळी, ह भ प वारकरी मंडळी माळेगाव यांची उपस्थिती होती. या कीर्तनाला मृदंगाची साथ ह.भ. प.भागवत महाराज माने यांनी केली. कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त व महिला उपस्थित होत्या. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये ह.भ.प. माधव महाराज भाग्यदळ, रोहिदास महाराज मस्के, हरी महाराज आजनसोंडा , गुरुराज महाराज देगलूर, लक्ष्मण महाराज भाकरवाडी , गौंड गुरुजी हसरणी, अमोल महाराज नळेगाव, कृष्णा महाराज धानोरा यांची सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता 20/2/2025 या दिवशी ह.भ.प. साईनाथ महाराज लंगडे टेंभुर्णी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!