मनसेच्या कृषी प्रदर्शनातील लकी ड्रॉ मधील विजेत्या शेतकऱ्यांना नांगर व रोटावेटरचे वाटप!

0
मनसेच्या कृषी प्रदर्शनातील लकी ड्रॉ मधील विजेत्या शेतकऱ्यांना नांगर व रोटावेटरचे वाटप!

मनसेच्या कृषी प्रदर्शनातील लकी ड्रॉ मधील विजेत्या शेतकऱ्यांना नांगर व रोटावेटरचे वाटप!

लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर व कृषी नवनिर्माण ऍग्रो प्रोड्युसर कंपनी नरवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कृषी नवनिर्माण 2025 या राज्यस्तरीय तिसऱ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात येणाऱ्या शेतकऱ्यासाठी लागणारे साहित्याचा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता.हा लकी ड्रॉ काढण्यात आला असून या लकी ड्रॉ तील विजेत्यांना ओम साई ऍग्रोच्या कार्यालयात मनसेचे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या मनसे राज्यस्तरीय तिसऱ्या कृषी प्रदर्शनातील लकी ड्रॉ तील पहिले बक्षीस परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील सुभान युसुफ सय्यद यांना ओम साई ऍग्रो शिर्डी यांच्या वतीने नांगर बक्षीस देण्यात आला, तर दुसरे बक्षीस लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील सूर्यकांत विश्वनाथ तोंडारे यांना धरती इंजिनिअरिंग राजकोट यांच्यावतीने रोटावेटर देण्यात आले.
यावेळी ओम साई ऍग्रो आणि धरती इंजिनिअरिंग यांचे मुख्य वितरक प्रदीप आलापुरे यांनी विविध शेती उपयोगी अश्या अनेक यंत्राची माहिती दिली.या लकी ड्रॉ प्रसंगी सचिन सिरसाट, भागवत कांदे,पांडुरंग कदम,रणवीर उमाटे,किरण चव्हाण,मुनव्वर सय्यद, जहांगीर शेख आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!