मसलगा पाटीवर ट्रकचा भिषण अपघात,दोघांचा जागेवर मृत्यू १ जण गंभीर जखमी
मसलगा पाटीवर ट्रकचा भिषण अपघात,दोघांचा जागेवर मृत्यू १ जण गंभीर जखमी
निलंगा (एल.पी.उगीले) : निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ५ वाजून ३० मिनीटाला कर्नाटक पासींगची केए – ३५ सी- ९८४५ या ट्रकच्या भिषण अपघातात प्रशांत काशीनाथ चिंतामणी (वय – २९ वर्ष), अशोक वैजनाथ चिंतामणी (वय – ३५ वर्ष) दोघे रा. काळे गल्ली,बस्वकल्याण या दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.
लातूर – जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बस्वकल्याण वरून लातुरच्या दिशेने सौर उर्जेचे लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडवरून खाली गेल्यामुळे ट्रकमधील लोखंडी ॲगल कॅबीनवर आल्याने केबीनचा चुराडा झाला आहे. व केबीन मधील दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला. घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबी च्या सहाय्याने अँगल बाजूला करून तीघांना बाहेर काढून रूग्नवाहीकेतून रूग्णालयात पाठवले. यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी, पोलीस जमादार सुनील पाटील आदीसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. व घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच रोडवरील वाहतूक सुरळीत केली.
