डोक्यात लोखंडी सळई घालुन मारहाण करून खिशातील २० हजार रूपयेची रक्कम काढून घेतली; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

0
डोक्यात लोखंडी सळई घालुन मारहाण करून खिशातील २० हजार रूपयेची रक्कम काढून घेतली; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

डोक्यात लोखंडी सळई घालुन मारहाण करून खिशातील २० हजार रूपयेची रक्कम काढून घेतली; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता तालुक्यातीलच हाडोळती येथील एका शेतकरी युवकास बळजबरीने खिचडी खा म्हणुन डोक्यात लोखंडी सळई घालुन जखमी करून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन खिशातील २० हजार रुपयेची रक्कम काढून घेतली असुन अहमदपूर पोलीसात सदरील चौघांविरूध्द दि २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, विश्वनाथ केदारलिंग हेंगणे रा हाडोळती ता अहमदपूर येथील शेतकरी युवक दि १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ : ०० वाजता शेतातील कांदे घेऊन नांदेड येथे विक्रि साठी गेला होता नांदेड तेथे कांदे विक्रि करून ४६५०० रू रक्कम मिळाली त्यापैकी २६००० रू रक्कम फोन पे अकाऊंटवर घेतली तर बाकीची रक्कम २०५०० रू नगदी घेऊन दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० :३० वाजता शिरूर ताजबंद ता अहमदपूर येथे बस स्थानकावर उतरून गावाकडे हाडोळती येथे जाण्यासाठी मित्र शकीर अयुब पठान याची वाट पाहत छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबला असता तिथे काही जण खिचडी खात बसले होते त्यातील रोहीत डोंगरे व त्याच्या सोबत आणखी तिघे जण शेतकरी हेंगणे या युवकाकडे आले आणी खिचडी खा म्हणु लागले भुक नाही म्हणताच शिवीगाळ करून तु खिचडी खात नाहीस का म्हणुन लोखंडी सळई डोक्यात घालुन जखमी करून मारहाण केली व त्यापैकी एकाने खिशातील २० हजार रूपयेची रक्कम काढून घेतली त्यांना प्रतिकार केला असता जा कोणाला सांगायचे ते सांग असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी युवक शेतकरी विश्वनाथ केदारलिंग हेंगणे रा हाडोळती ता अहमदपूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि २० फेेब्रुवारी रोजी अहमदपूर पोलीसात रोहीत डोंगरे रा शिरूर ताजबंद ता अहमदपूर तसेच तीन अनोळखी इसमावर भारतीय न्याय संहीता (बि.एन.एस ) २०२३ कलम ११९ (१ ),३५२,३५१ ( २ ) ३५१(३ ), ३( ५ ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पि. एस.आय स्मिता जाधव ह्या करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!