खोटी फिर्याद देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी FIR करावा; अन्यथा 22 जणांचा आमरण उपोषणाचा इशारा
खोटी फिर्याद देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी FIR करावा; अन्यथा 22 जणांचा आमरण उपोषणाचा इशारा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील थोट सावरगाव येथील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने गावातीलच तब्बल 22 जणांवर पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता दिलेली फिर्याद खोटी असून दाखल झालेला गुन्हा रद्द करून सदरील व्यक्ती विरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी 22 जणांनी उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर दि 25 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की ,अहमदपूर तालुक्यातील थोट सावरगाव येथील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने गावातीलच तब्बल 22 जणांवर काही दिवसांपूर्वी अहमदपूर पोलिसांत फिर्याद देऊन गुन्हा नोंद केला होता दाखल झालेला गुन्हा रद्द करावा व खोटी फिर्याद देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सदरील व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमरण उषोपणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
या निवेदनात म्हटले आहे की ,मी व माझ्या सह 22 जनावर श्री. शेषेराव शिवमूर्ती कोरनुळे या व्यक्तीने दिनांक 14-02-2025 रोजी खोटी फिर्याद दिली आहे. त्यामुळे खोटी फिर्यादी देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी व माझ्यासह 22 लोकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी योग्य त्या फौजदारी संहितेनुसार त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी आपल्या विरुद्ध दाखल केलेला खोटा FIR (गुन्हा नंबर 82/2025
कलम 189 (2), 191 (2), 190, 352, 351(2) (3)) रद्द करण्यात यावा.
अन्यथा ज्याअर्थी दोन्ही बाजूचे व्हिडिओ फुटेज पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनुर साहेब, प्रभारी आयपीएस पोलीस निरीक्षक सागर खरडे साहेब यांनी व्हिडिओ फुटेज पाहिले आहेत. ज्यात शिवीगाळ किंवा मारहाण कोठेही केलेली दिसत नाहीत. त्या अर्थी दिलेली शेषेराव शिवमूर्ती कोरनुळे यांनी दिलेली फिर्यादी खोटी आहे.
संबंधित प्रकरणात खोटी तक्रार दाखल करणाऱ्या विरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद नाही झाल्यास व आम्हा 22 लोकांचे आर्थिक व मानसिक उत्पीडन या प्रकरणी गुन्हा नोंद न झाल्यास आणि आमच्याविरुद्धचा खोटा गुन्हा रद्द न झाल्यास आम्ही 22 लोक आपल्या कार्यालयासमोर दिनांक 25-2- 2025 पासून अमरण उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे
निवेदनावर रामचंद्र कोरनुळे, बसवेश्वर कोरनुळे, काशिनाथ कोरनुळे, संगमेश्वर ढोले, अंदास कोरनुळे, मुकेश कोरनुळे, माणिक जळबा केसाळे, व्यंकटी कोरनुळे, दत्ता कोरनुळे, हनुमंत कोरनुळे, मन्मथ कोरनुळे, गंगा कोरनुळे, कमलेश्र्वर कोरनुळे,नारायण कोरनुळे, ज्ञानेश्वर कोरनुळे, सुधाकर गाठोडे , अशोक गोणे आदीसह 22 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
