छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप च्या वतीने शिव जयंती साजरी
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप च्या वतीने शिव जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : अखंड भारत हिंदवी स्वराज्य मध्ये आणणारे, महाराष्ट्राचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची 398 वी जयंती छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर नी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ७:०० वाजता योगा मैदानावर मान्यवरांच्या उपस्थित साजरी केली
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री विक्रम सिंह कच्छवे, श्री माधव तिगोटे, ह भ प संजय महाराज नागपूरने, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री अशोक चापटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला, श्री गणेश वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर छान पैकी पोवाडा सादर केला. आम्ही कडे डोंगरचे राहणार चाकर शिवबाचे होणार या पोवाड्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
पुढे बोलताना अशोक चपटे सरांनी सांगितले की सर्व जाती-धर्माचे लोक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने जाती निर्मूलनाचे कार्य शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केले. रायगड किल्ल्याची पाहणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी आले होते, एवढा उत्तुंग किल्ला बघून त्यांचे डोके चक्रावले, अख्खा एक दिवस त्यांना किल्ला चढून जाण्यात लागला. वरी गेल्यानंतर त्यांनी पाहिले की अंबारी हौदामध्ये अजस्त्र दोन हत्ती होत आहेत, त्यांनी काही लोकांकडे विचारणा केली की एवढे अजस्त्र हत्ती किल्ल्यावर कसे आणले. कोणाकडूनही त्यांचे समाधान न झाल्यामुळे शेवटी ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाऊन नम्रपणे शिवाजी महाराजांना विचारले की तुम्ही एवढे अजस्त्र हत्ती किल्ल्यावर कसे आणले जिथे माणसांना सुद्धा किल्ल्यावर चढता येत नाही तेव्हा महाराजांनी सांगितले की हे पिल्ले छोटे छोटे होते तेव्हाच आम्ही आणले होते कारण पुढे या हत्तीच आम्हाला काम पडणार होतं
तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हटले की एवढ्या दूरदृष्टीचा राजा जगामध्ये कुठेच मिळणार नाही आणि एवढ्या दूरदृष्टीच्या राजाला कोणीही पराभूत सुद्धा करणार नाहीत. असे अनेक शिवाजी महाराजांवर चे दुर्मिळ किस्से त्यांनी सांगितले या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी दुगाने यांनी मानले.
