संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिव जयंती उत्साहात साजरी

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिव जयंती उत्साहात साजरी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिव जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेवून अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
प्रारंभी लिनेस क्लब च्या अध्यक्षा तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव, प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी माता पालक संघाच्या उपाध्यक्षा निलिमा रमेश भालेराव,शिक्षक पालक संघाचे सदस्य मच्छिंद्र फाजगे,मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह मान्यवरांची उपस्थिती होती.
नीलिमा रमेश भालेराव यांच्या वतीने पोवाडा गायन, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा,शिवाजी महाराजांच्या जीवनावर नाटिका तसेच विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत द्वितीय आलेली आरुषी फाजगे, तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय आलेली श्रेया तिगोटे, जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना लीनेस क्लबच्या अध्यक्षा रेखाताई हाके-तरडे यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी घोगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!