माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा साठी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा साठी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
अहमदपूर (गोविंद काळे) : अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथे असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षा केंद्रावर आलेल्या सर्व परीक्षार्थींची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या परीक्षा केंद्रावर एकूण 300 परीक्षार्थी आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिवराज्य माने, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री दत्ता भाऊ गलाले, केंद्र संचालक राजकुमार पाटील, मुख्याध्यापक प्रशांत माने, पत्रकार मित्र सांगवीकर सर अमर जाधव, फिरोज शेख, मनोज कदम यावेळी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत व तणाव रहीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व मान्यवरांनी परीक्षा त्यांना तणावमुक्त प्रसन्न चित्ताने परीक्षा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
