अमृता वजीर चे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत यश

0
अमृता वजीर चे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत यश

अमृता वजीर चे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अमृता जयपद्म वजीर ची कृती संशोधन व मुलाखतीसाठी निवड झाली आहे. बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ,मुंबई आयोजित डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेला महाराष्ट्रातून 87000 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. सदरील परीक्षेला विद्यालयाचे 65 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अमृता वजीर, आर्या दुधाटे व मयूर उप्पलवाड या तीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली होती. अमृता वजीर व तिच्या मार्गदर्शक शिक्षिका प्राजक्ता भोसले यांचा संस्थाध्यक्ष माननीय गणेशदादा हाके पाटील, संचालक सुरेंद्र चाकूरकर,प्रा.हनुमंत देवकते, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना जांभळदरे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!