जानकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
जानकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : दि . १९ फेब्रुवारी रोजी जानकी महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सौ शितल खोमणे ,प्राचार्य डॉक्टर केतन खोमणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवाजी महाराज यांच्या कामगिरीवर भर दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीक्षा लामतुरे व प्राध्यापक जगताप आकांक्षा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.अजय स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक आगलावे वैष्णवी, प्राध्यापक गिरी प्रदीप ,प्राध्यापक देशमुख जोहरा गोपाळ म्हेत्रे, प्रसाद गुंडरे, प्रसाद सूर्यवंशी ,विद्यासागर धुळगुंडे, सलीम पठाण, कांबळे श्रीकांत, मुरकुटे वामन, रुद्रवाड पांडुरंग, गायकवाड उमादेवी, बेंबडे उद्धव, इत्यादी इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
