उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्समध्ये चमकदार कामगिरी
उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्समध्ये चमकदार कामगिरी
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे जानेवारी 2025 मध्ये घेतलेल्या जेईई मेन्स सेशन-1 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ध्रुव पारसेवाऱ यांनी 99.91 पर्सेंटाइल मिळवत महाविद्यालयात अव्वल स्थान मिळवले. तसेच मारमवार वेदिका (90 पर्सेंटाइल), सायली सोनकांबळे (86 पर्सेंटाइल), वैष्णवी मोरे (85 पर्सेंटाइल), शुभम उगीले (79.43 पर्सेंटाइल) आणि हर्षल कांबळे (73.35 पर्सेंटाइल) यांनीही उत्तम कामगिरी केली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके आणि सदस्य प्रा. मनोहर पटवारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मूडपे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. टी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. एन. के. खांडेकर यांनी मानले.
