श्री पांडुरंग विद्यालयाचा प्रयोग राज्यस्तरावर

0
श्री पांडुरंग विद्यालयाचा प्रयोग राज्यस्तरावर

श्री पांडुरंग विद्यालयाचा प्रयोग राज्यस्तरावर

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुदानित या गटातून हॅॅकेथॉन विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रयोगाची आता पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपक्रमशील शिक्षक नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील चिमुकल्यांनी लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोग स्पर्धेत मच्छरांचा नायनाट करण्यासाठी धुपबत्ती व अगरबत्ती बनविण्याचा प्रयोग सादर केला. या प्रयोगाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली, यात विद्यार्थी श्रीमंगले योगेश मारुती व कासले प्रतीक निवृत्ती यांचा समावेश आहे. यशस्वीतांचे डायटच्या प्राचार्या डॉ.भागीरथी गिरी, डॉ. मारुती सलगर, डॉ. जगन्नाथ कापसे, डॉ. राजेश गोरे, गंगा मेनकुदळे, गटशिक्षणाधिकारी शेख , केंद्रप्रमुख राघोबा घंटेवाड, संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गोविंदरावजी केंद्रे , संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!