सोमनाथपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे 62 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश बहाल
सोमनाथपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे 62 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश बहाल
उदगीर (एल.पी.उगीले) : घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश घरपोच मिळावेत या उद्देशाने ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील 20 लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण आणि 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम 22 फेब्रुवारी 2025 दुपारी 4.45 वाजता पुणे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे करण्यात आले त्या अनुषंगाने सोमनाथपूर ग्रामपंचायत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे आवास योजनेचे इंजिनिअर वैभव पाटील तसेच ऑपरेटर अनिल कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सोमनाथपूर येथील 62 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले. यावेळी सरपंच अंबिका पवार, ग्रामपंचायत अधिकारी अवकाश पवार, ग्रामपंचायत सदस्या तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उदगीर विधानसभा प्रमुख सौ. शिवकर्णा अंधारे, सुभाष राठोड, सुजीता चव्हाण, श्रीदेवी वैजापूर, अश्विनी बामणे, अश्विनी घोगरे सह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.
