चैतन्य धारा क्रिकेट टर्फ चा ह.भ. प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते शुभारंभ

0
चैतन्य धारा क्रिकेट टर्फ चा ह.भ. प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते शुभारंभ

चैतन्य धारा क्रिकेट टर्फ चा ह.भ. प. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते शुभारंभ

लातूर (एल.पी.उगीले) : लातूरच्या क्रीडा विश्वात एक नवीन दालन “चैतनधारा क्रिकेट टर्फ” च्या माध्यमातून निर्माण झाले असून त्याचा शुभारंभ हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हस्ते आणि सुरेश गोविंदरावजी दिवाण, लोकाधिकार प्रमुख तथा लोकाधिकार न्यूज संपादक व्यंकटराव पनाळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश गोमचाळे, सुदर्शन बोराडे, विश्वकर्मा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिबीन कापून आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला आहे.
लातूरच्या क्रिकेट प्रेमी साठी हरंगुळ (बु.) शिवारातील बार्शी रोडवरील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ, प्रिन्स पत्रा शेजारी असलेल्या “विश्वकर्मा गार्डन अँड फंक्शन हॉल” येथे अनंत पांचाळ यांनी हे चैतनधारा क्रिकेट टर्फ निर्माण केले आहे.
हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, व्यंकटराव पनाळे, ॲड. गणेश गोमचाळे या मान्यवरांचा अनंत पांचाळ व सचिन दिवाण यांनी शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की, अनंत पांचाळ यांनी जागा मालक दिवाण यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यातच ते यशस्वी ठरले असून क्रिकेट खेळाडूंना एक अत्यंत चांगले दालन पांचाळ यांनी निर्माण केले आहे. त्यांची या व्यवसायात अत्यंत चांगली प्रगती होईल, असा आशीर्वाद दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे व्यंकटराव पनाळे यांनी चैतन्यधारा क्रिकेट टर्फ चा शुभारंभ चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते झाला असल्याने अनंत पांचाळ यांच्या जीवनात चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने व्यवसायाची आणि पांचाळ परिवारांची भरभराट होईल असे व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. गणेश गोमचाळे यांनी केले. गोमचाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात अनंत पांचाळ यांनी व्यवसायामध्ये शून्यातून भरारी घेतली असून पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा माणूस म्हणून अनंत पांचाळ यांचा उल्लेख केला.
या कार्यक्रमास सुदर्शन बोराडे, दिलीप पिनाटे, ॲड. प्रमोद पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!