शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अन्नदान व वह्या वाटप
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अन्नदान व वह्या वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड व छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व शिवभक्तांना अन्नदान व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व पेन वाटप करण्यात आले. या हजारो शिवभक्तांना सेवाकुंडचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड , यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजेश चव्हाण हे लाभलेले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार अंबादास अल्लमखाने हे होते. तसेच दत्तात्रेय भोसले, विशाल देवणे, राजीव किनीकर, अझरुद्दीन शेख, मनोहर लोहारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून उत्तम बिरादार, पी. एम. पंढरपुरे, अजय बिरादार, संतोष जाधव, करण भोळे, बापूसाहेब कांबळे हे होते. तसेच उदगीर येथील संस्कार विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उत्तम बिरादार, मुख्याध्यापक मुसने , बालिका मुळे, मुख्याध्यापक एम. जी. हरकरे, मनमत मुंडे यांच्या उपस्थितीत सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडण्यात आला.
