बनशेळकी येथे शिवजयंती मोठया उत्सहात साजरी

0
बनशेळकी येथे शिवजयंती मोठया उत्सहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)उदगीर तालुक्यातील बनशेळकी या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेलछायाचित्राची गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शिवजयंती समितीच्या वतीने अल्पउपोहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते देवा घटे, राजकुमार भालेराव, सावंन तोरणेकर, सुबोध एकुरगेकर,सोसायटी चेअरमन प्रल्हाद महाजन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुरनाथ बिरादार, रोहिदास लोहारे, नामदेव सावळे, एकनाथ सूर्यवंशी, महादेव पाटील, आण्णासाहेब बनशेळकीकर, बालाजी बंडे,मनोज गवारे,शिवलिंग आंबेगावे, शिवाजी कांबळे, अबादास चिखलचादे, सोपान सावळे,उमाकांत लोहारे उमाकांत सूर्यवंशी, संग्राम ग्वारे,लक्ष्मण हाडोळे,सचिन महाजन, कपिल आवळे, ई उपस्थित होते.या वेळी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदरील जयंती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव सावळे, कुमार मोरे ज्ञानेश्वर जमादार, नागेश मगनाळे, अमोल तेलगपुरे, अरविंद पचाळ, विरेश मलकापुरे, भागवत काबळे,ई प्रत्यन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!