शिरूर अनंतपाळच्या युवकांचा लोकसभा, राज्यसभा अभ्यास दौरा
शिरूर अनंतपाळच्या युवकांचा लोकसभा, राज्यसभा अभ्यास दौरा
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : शिरूर अनंतपाळ शहरातून व तालुक्यातून कवी, लेखक, साहित्यीक तसेच रसिक हे देशाची राजधानी दिल्लीमध्ये संपन्न होत असलेले 3 दिवसीय 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या साहित्य संमेलनाचा आनंद घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव. महादेव आवाळे व लोकप्रिय नगरसेवक. सुधीर लखनगावे यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची संसद पाहण्याचा योग आला त्यात 1950 साली संविधान सभेचे आयोजन व संविधानाचे पहिले वाचन झालेले ऐतिहासिक सेंट्रल हॉल,तसेच नवीन लोकसभा व राज्यसभा अधिवेशन काळात होत असलेल्या अद्यावत सुखसुविधा असलेले सभागृह तसेच जुनी लोकसभा व नविन लोकसभा यातील फरक व नविन लोकसभेत संपुर्ण देशातील राज्याचा सांस्कृतिक,धार्मिक तसेच ऐतिहासिक अश्या सर्व दृष्टीने तयार केलेले देखावे विविध स्थळे आणि सर्व केंद्रिय मंत्री मंडळातील मंत्री यांचे कार्यालय, सर्व राष्ट्रीय पक्षाचे कार्यालय, राष्ट्रपती भवन, कार्यालयीन कामकाज, विवीध विभागाचे सचिव भेटी या सर्व गोष्टीचा जवळून अभ्यास करण्याचा दुर्मीळ योग अगदी सहजपणे संसद भवन परिसरात प्रवेशासाठी अडचणी असताना सुध्दा सहजपणे लोकप्रिय नगरसेवक सुधीर लखनगावे यांचे जवाहर नवोदय विद्यालया, लातुर येथील भारतीय प्रशासन सेवेतील मित्र परमेश्वर सेलुकर व कारंडे प्रशांत यांनी उपलब्ध करुन संसद भवन परिसरात विविध ठिकाणाची स्वतः सोबत उपस्थित राहून सखोल मार्गदर्शन व सर्व माहिती सखोलपणे सांगितली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, नगरसेवक. सुधीर लखनगावे, अँंड. रमेश उंबरगे, प्रा. सुधीर येरोळकर, कुणाल लोनावत, डाँं. मडके, फाळके, अँंड. विठ्ठल आदित्या, सौ.दाभाळे ई.उपस्थीत होते.
