सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 20/02/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे
अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, आणि मंडळाच्या सचिव रेखाताई तरडे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तथा सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांना आत्मसात करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन कोईलवाड सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे, अफजलखान ई. वेशभूषा साकारली , तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करण्यात आले. शिवाजी महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!