विद्यावर्धिनीच्या २२ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड्स राज्य पुरस्कार
विद्यावर्धिनीच्या २२ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड्स राज्य पुरस्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य कार्यालयातर्फे दि. १४ ते १७ डिसेंबर २४ या कालावधीत राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा शिबिर राज्य प्रशिक्षण केंद्र लातूर येथे घेण्यात आले. या शिबिरात अहमदपूर येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांना भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.
या चाचणी शिबिराचे शिबिर प्रमुख महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड राज्य आयुक्त बोतीकर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा संघटन आयुक्त देशपांडे, लातूर जिल्हा संघटन आयुक्त शंकर चामे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चाचणी परीक्षा संपन्न झाली असून यात विद्यावर्धनी विद्यालयाचे गाईड दिव्या सिंहाते, शितल केंद्रे, श्रुती वलसे, गौरवी गडदे, खुशी मुकणर, माया भगनुरे, अक्षरा मुंडे, निशा पठाण यांचा समावेश असून स्काऊट चे रुद्र माने, कार्तिक माने, हर्ष माने, सुदर्शन गोरे, श्रवण मुस्तापुरे, मनीष बोरसपट्टे, कृष्णा नरवटे, करण कासले, संगम जायभाये, सुमित केंद्रे, करण राठोड, श्रेयश देवणे, गणेश केंद्रे, आदिनाथ तुपकर हे राज्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर हुसेन पठाण व गाईड कॅप्टन कविता कोलबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापिका सुषमा पाटील, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
