रंगकर्मी प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे थाटात पारीतोषिक वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) : संंविधानदिन अमृत महोत्सवी वर्ष निमित्त रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठान व सृजन सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला, रंगभरण, निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित सोहळ्यात करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ राजकुमार मस्के हे होते. तर पारितोषिक वितरण सहआयुक्त कामगार आयुक्त मंगेश झोले, तहसीलदार राम बोरगावकर , गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर मुख्याध्यापक दिलीप हणमंते, प्रा डाॅ सुशिलप्रकाश चिमोरे, ज्ञानेश्वर बडगे, निवृत्ती जवळे,रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव ज्योती कवडेकर मद्देवाड, महादेव खळूरे, उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागृती , संविधाने दिलेले अधिकार व कर्तव्य ,राष्ट्रीय प्रतिके या विषयी विद्याद्यार्थ्यांमध्ये जानिव जागृती व्हावी.यासाठी राज्यस्तरीय चिञकला निंबध लेखन व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी विजेत्यांना रोख रक्कम , गौरवचिन्ह , प्रमाणपञ मिन्यवरिंच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले सूत्रसंचलन रसुल पठाण यांनी व आभार प्रा. ज्योती कवडेकर मद्देवाड यांनी मानले.यावेळी सचिन शिवशेट्टे, नागनाथ गुट्टे,अनिलकुमार गायकवाड,मनोहर लोहारे,संदिप निडवदे, बाबासाहेब मादळे इत्यादी उपस्थित होते.
